नितीन भोईटे - तब्बल १००० किल्ल्यांवरील पाषाण संग्रहित करणारा दुर्गप्रेमी

शिवप्रेमाचा व दुर्गभ्रमंतीचा ध्यास घेऊन नितीन भोइटे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान, दीव दमण, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आदी राज्यांतले किल्ले सर करून या दुर्गांची आठवण म्हणून प्रत्येक किल्ल्यावरून एक एक पाषाण येताना सोबत आणला.

नितीन भोईटे - तब्बल १००० किल्ल्यांवरील पाषाण संग्रहित करणारा दुर्गप्रेमी
नितीन भोईटे

एखाद्या गोष्टीचा ध्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतो व अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळतात व या पैकी एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील व देशातील तब्बल १००० किल्ले सर करून त्यावरील पाषाण गोळा करून त्यांचे संग्रहालय उभारणारे एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व व या व्यक्तिमत्वाचे नाव आहे नितीन भोईटे.

शिवप्रेमाचा व दुर्गभ्रमंतीचा ध्यास घेऊन नितीन भोइटे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान, दीव दमण, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आदी राज्यांतले किल्ले सर करून या दुर्गांची आठवण म्हणून प्रत्येक किल्ल्यावरून एक एक पाषाण येताना सोबत आणला.

नितीन भोईटे यांनी निर्माण केलेले हे अनोखे संग्रहालय पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येत असतात. किल्ल्यांवरील पाषाण संग्रहित करण्यामागे त्यांची स्मृती जपणे हा उद्देश होताच मात्र प्रत्येक राज्यातील पाषाणाचे एक वेगळे वैशिट्य असते उदाहरणार्थ कर्नाटक व राजस्थान राज्यात संगमरवरी प्रकारातले, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यात मृदा असलेले आणि महाराष्ट्राच्या सोलापूर भागात काळे व कठीण असे पाषाण आढळून येतात. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गांच्या व मावळ्यांच्या साथीने रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली मात्र आज शिवरायांचे हे किल्ले फारसे संवर्धन होत नसल्याने दुरावस्थेत आहेत त्यामुळे जनजागृती होऊन गडकोटांचे संवर्धन व्हावे हा नितीन भोईटे यांचा या ध्यासामागील उद्देश आहे. 

नितीन भोईटे यांच्या प्रयत्नांची दखल ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि आशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स या संस्थांनी सुद्धा घेतली असून त्यांच्या नावावर एक नव्हे तर पाच ते सहा रेकॉर्ड्स ची नोंद आहे आणि. नितीन भोईटे यांच्या पावलांवर पाऊल टाकून त्यांची लहानगी कन्या वैष्णवी भोईटे हिने सुद्धा एकाच दिवसात सर्वाधिक किल्ले सर करण्याचा विक्रम केला असून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेतली आहे.

आगामी काळात किल्ल्यांचा व किल्ल्यांवरील पाषाणांचा इतिहास सांगून जनजागृती करणारी एक संस्था स्थापन करण्याचा नितीन भोईटे यांचा मनोदय असून या कार्यास मराठी बझ तर्फे हार्दिक शुभेच्छा.